१० वी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये ड्रायव्हर पदांसाठी सरळ नोकरीची सुवर्णसंधी!
Post Office Driver Bharti 2025
मित्रांनो, पोस्ट विभागात डायरेक्ट नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. या साठी आपल्याला कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाही. डाक विभागाने Post Office Driver Bharti 2025 कार चालकाच्या पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. इंडिया पोस्ट (डाक विभाग) ने स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. इंडिया पोस्टने चार वेगवेगळ्या भागांसाठी एकूण २५ पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०२५ आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीतून निवडलेले उमेदवारांना चांगला पगार आणि सरकारी नोकरीचे फायदे मिळतील.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही आवश्यक पात्रता पूर्ण करावी लागेल. उमेदवारांची निवड प्रक्रिया कोणतीही लेखी परीक्षा न घेता होणार आहे. तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्य, अनुभव आणि पात्रता पाहून निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात अर्ज करावे. अधिक माहिती साठी तुम्ही India Post Staff Driver Recruitment 2025 Official Notification Pdf डाउनलोड करून पाहू शकता.
उमेदवार पात्रतेसाठी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराकडे हलक्या आणि जड मोटर वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे किमान तीन वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असावा. वयोमर्यादेच्या अटीनुसार, उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
या भरतीचीअर्ज प्रक्रिया एकदम सोपी आहे. इंडिया पोस्टच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वप्रथम इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट [www.indiapost.gov.in](http://www.indiapost.gov.in) वर जा. वेबसाइटवर उपलब्ध असलेला ऑफलाइन अर्ज डाउनलोड करा. अर्ज व्यवस्थित व अचूकरीत्या भरणे अत्यावश्यक आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, जसे की शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, वैध ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत, अनुभव प्रमाणपत्र, ओळखपत्र, तसेच मागील पासपोर्ट आकाराचा फोटो संलग्न करा. हे सर्व कागदपत्रे संपूर्ण तपासून आणि योग्य क्रमाने जोडून खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवा:
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
सीनियर मॅनेजर,
मेल मोटर सर्व्हिस,
नंबर ३७, ग्रीम्स रोड,
चेन्नई – ६००००६
अर्ज वेळेत पाठवण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल. अर्जासोबत कोणत्याही आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज सादर करताना पूर्ण काळजी घ्या.
Job kot aahe
No
ड्रायव्हर जाँब
job mumbaila ahes.