8500 पोलीस पदांच्या भरतीला मिळाली मंजुरी! लवकरच अधिकृत नोटिफिकेशन..!

police-recruitment-2025

राज्यात 8 वर्षांपूर्वी शेवटची सब-इन्स्पेक्टर आणि शिपाई पदभरती झाली होती. आता पुन्हा एकदा 500 एसआय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या 1200 हून अधिक पदे रिक्त आहेत, पण भरतीसाठी नियमांमध्ये काही बदल आवश्यक होते. हे बदल आता शासनाने मंजूर केले असून लवकरच अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) प्रसिद्ध होईल. या भरतीची मागील आठ वर्षपासून राज्याला प्रतीक्षा होती, परंतु कागदी कार्यवाहीत हि भरती प्रक्रिया अडकली होती. अखेर आज या भरतीला हिरवा कंदील देण्यात आला आहे. या मुळे मध्यप्रदेश मधील पोलीस भरतीची तयारी करत असेल्या उमेदवारांना मोठा दिलासा भेटला आहे. 

Polince Bharti Update

मध्य प्रदेश गृह विभागाने राज्यातील पोलिस दलातील 25,000 रिक्त पदांपैकी 8,500 पदांच्या भरतीला अंतिम मंजुरी दिली आहे. यामध्ये 7,500 शिपाई (कॉन्स्टेबल), 500 सब-इन्स्पेक्टर (एसआय) आणि 500 ऑफिस स्टाफच्या पदांचा समावेश आहे. या मोठ्या भरती प्रक्रियेमुळे पोलिस दलाला आवश्यक मनुष्यबळ मिळणार असून सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. शासनाने या भरतीसाठी हिरवा कंदील दाखवला असून लवकरच अधिकृत प्रक्रिया सुरू होईल.

आठ वर्षांनंतर राज्यात सब-इन्स्पेक्टर भरती होणार आहे. पोलिस मुख्यालयाच्या भरती शाखेच्या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने नियमांत सुधारणा केली आहे. शासनाने 30 जानेवारीला ऑफिस स्टाफ भरतीलाही मान्यता दिली असून, आता 7500 शिपायांच्या भरतीलाही लवकरच अंतिम मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.

सध्या मध्य प्रदेश पोलिस दलात एकूण 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत, मात्र 25,000 पदे अद्याप रिक्त आहेत. दरवर्षी 500 ते 700 पोलिस कर्मचारी निवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या सातत्याने वाढत आहे. या परिस्थितीची दखल घेत शासनाने तातडीने निर्णय घेतला असून, भरती प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच अधिकृत भरती प्रक्रिया सुरू करून रिक्त पदे भरली जातील, ज्यामुळे पोलिस दलाचे मनुष्यबळ वाढण्यास मदत होईल.

डीजीपी कैलाश मकवाणा यांचे वक्तव्य
“मध्य प्रदेश पोलिस दलात सध्या मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. शासनाने यावर गांभीर्याने विचार करून नव्या भरतीस मंजुरी दिली आहे. लवकरच संपूर्ण भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.”

ही मोठी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास मध्य प्रदेश पोलिस दलाला नव्या तुकड्या मिळतील आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.