लागा तयारीला, पुढच्या महिन्यात दहा हजार पदांची पोलीस भरती सुरु होणार!

maharashtra police bharti 2025 Online For Date

दरवर्षी सरासरी १० ते १५ टक्के गुन्ह्यांमध्ये वाढ होत असली, तरी मागील काही वर्षांत हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. राज्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यासोबत पोलिसांच्या मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे पोलिस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या रिक्त पदांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु असून, डिसेंबर २०२४ पर्यंत आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस विभागात नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरती अंतर्गत १० हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणारी पदेदेखील भरली जाणार असल्याची माहिती आहे. या भरती मध्ये चालक, पोलीस शिपाई, SRPF आणि रेल्वे पोलीस ची भरती होणार आहे. 

maharashtra police bharti 2025

भरती प्रक्रियेचे नियोजन: maharashtra police bharti 2025 Online For Date
भरती प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या टप्प्यात सुमारे आठ ते दहा हजार पोलिस पदांची भरती होण्याची शक्यता आहे. मागीलवेळी १७ हजार पदांसाठी राज्यभरातून १८ लाख अर्ज आले होते. यंदाही मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याचा अंदाज असून, त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. या भरतीचा मैदानी टप्पा पावसाळ्याआधी पूर्ण केला जाऊ शकतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठीच्या तयारीला आणखी वेग देण्याची आवश्यकता आहे. या भरती प्रकियेमुळे राज्यातील हजारो तरुणांचं पोलीस विभागात काम करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहेया पोलीस भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित केली जाणार आहे.

महासंचालकांच्या सूचना:
मागील आठवड्यात पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांनी सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना त्यांच्या विभागातील रिक्त पदांची माहिती मागवली आहे. डिसेंबर २०२४ ते डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त होणारी पदे, पदोन्नती प्रक्रिया, अनुकंपा तत्त्वावरील राखीव पदांची यादी आणि आंतरजिल्हा बदलीच्या पदांचा आढावा घेऊन माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवीन पोलिस ठाण्यांचे प्रश्न:
सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, कोल्हापूर, सातारा यांसारख्या शहरांमध्ये लोकसंख्या वाढ होत असतानाही नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहेत. राज्यातील ३०६ एमआयडीसींमधील उद्योजकांना खंडणीच्या प्रकारांना सामोरे जावे लागत असूनही या भागांमध्ये नवी पोलिस ठाणी उभारण्यात आलेली नाहीत.

अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांचे मत:
“डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली व डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे. ती प्राप्त झाल्यानंतर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल आणि लवकरच प्रक्रिया सुरु केली जाईल.”

Leave A Reply

Your email address will not be published.