लेखा कोषागार अमरावती विभागात कनिष्ठ लेखापाल पदांची भरती सुरु, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!
Lekha koshagar Amravati Bharti 2025
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती याविभागांतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदांच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही नवीन जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक २९ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार आहे. तसेच लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, अमरावती, कोषागार कार्यालय, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) (वेतन स्तर एस-१०-२९२००-९२३०० या वेतनश्रेणीत) या संवगांतील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. २. वरील राखीव विनराखीव पदांच्या संख्येत बदाल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणांचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.
रिक्त पदांचा तपशिल : लेखा कोषागार , अमरावती अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदासाठी 45 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यामुळे अधिक माहिती साठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क सामान्य/EWS उमेदवारांसाठी 1000/- रुपये आहे, तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 900/- रुपये आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. अर्ज 29 जानेवारी 2025 पासून सुरु होतील आणि 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत. अधिक माहिती आणि अर्जासाठी अधिकृत वेबसाईट https://mahakosh.maharashtra.gov.in/ वर भेट द्या.
उपरीका पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाथासाठी व दिव्यांगासाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता गुणवत्ता क्रमविवनुसार भरली जातील. सदर नाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग अधिनियम दिनांक २६.०२.२०२४ व संबंधित शासन निर्णय दिनांक २०.०२.२०२४ संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र. ३४६८/२०२४ व इतर अन्वये दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील मा. न्यायालयाच्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित शिफारसी व नियुक्त्या उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येतील.
अर्ज कसा करावा : वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात पाहा.
आणि हो मित्रांनो, तसेच नोकरी संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉news24.mahabharti.in वेबसाईट ला रोज भेट दया.
प्रस्तुत जाहिरात ही परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील दिनांक २९.०१.२०२५ रोजी https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सर्वसाधारण सूचना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे कृपया अवलोकन करावे. भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील, उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी ध्यावयाची आहे. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती