महत्वाचे! ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू, काय पद्धत जाणून घ्या!

‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाची पडताळणी सुरू

 

सध्या महाराष्ट्र गाजत असलेल्या लाडकी बहीण योजतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचा उपक्रम सरकार तर्फे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, मुंबईतील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यांच्याअंतर्गत अनुक्रमे २,७२४ आणि १,१२७ महिला लाभार्थी आहेत. या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे का, याची तपासणी सध्या सुरू आहे. जर कोणी एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळले, तर त्यांना केवळ एकाच योजनेचा लाभ दिला जाईल आणि इतर योजना रद्द करण्यात येतील, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनांद्वारे निराधार महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, शासनाच्या नियमानुसार एका योजनेचा लाभ घेत असताना दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही. तरीही काही महिलांनी एकापेक्षा अधिक योजना घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सखोल पडताळणी केली जाणार आहे. अशा लाभार्थींनी स्वतः निवड करून एकाच योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नवीन अर्जांची काटेकोर पडताळणी

सध्या संजय गांधी निराधार योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, यावेळी लाभार्थी आधीच दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत का, याची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने आधीच एका योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्याचा अर्ज अस्वीकृत केला जाईल.

महत्वाची कागदपत्रे आणि पडताळणी प्रक्रिया

महसूल विभागाने संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थींची आधार कार्डे, बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत अंतिम पडताळणी केली जाणार आहे.

…तर अनुदान होईल बंद!

या पडताळणीमध्ये जर कोणी एकापेक्षा अधिक योजना घेतल्याचे आढळले आणि त्यांनी कोणती योजना सुरू ठेवायची आहे, याबाबत स्वयंघोषणापत्र सादर केले नाही, तर संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान बंद केले जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.