रेल्वेत ३२ हजार ४३८ पदांची 10 वी पासची बंपर भरती सुरु! २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मुदत!

Indian Railway 2025 Bharti

भारतीय रेल्वे कडून रेल्वे ग्रुप डी मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती होणार आहे. भरती मोहिमेद्वारे एकूण ३२, ४३८ पदांची भरती होईल. अर्ज प्रक्रिया २३ जानेवारीपासून सुरू २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया भारतीय रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड कडून आयोजली आहे. भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट बोडांद्वारे देशातील विविध रेल्वे विभागांसाठी विविध पदांची भरती निघाल्याने सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध होईल. यासाठी इच्छुक उमेदवार रेल्वे भरती बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वर आवश्यक माहिती घेवू शकतात. – Indian Railway 2025 Bharti

Railway Bharti 2025

www.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येईल. भरतीमध्ये उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जात सुधारणा करण्याची देखील संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज सुधारणेसाठी ऑनलाईन विंडो २५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. ती ६ मार्चपर्यंत सुरू राहील. या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या अर्जात झालेल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील.

 

वयोमर्यादा १८ ते ३६ वर्षादरम्यान
रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १ जानेवारी रोजी १८ ते ३६ वर्षांच्या दरम्यान असावी. यात आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना त्यांच्या वयोमयदित सवलत देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात ३ वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे सूट देण्यात आली आहे. उमेदवारांच्या वयाची गणनाही १ जानेवारी २०२५ पासून केली जाईल.

या विविध पदांसाठी असेल भरती प्रक्रिया
सहाय्यक (एसएंडटी), सहाय्यक (वर्कशॉप), सहायक
कॅरेज आणि वॅगन असिस्टंट ब्रिज, सहायक लोको शेड (डिझेल), सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल), सहायक लोको शेड (इलेक्ट्रिकल), सहाय्यक (पी.वे.), सहायक टी एल अँड एसी (वर्कशॉप), सहायक टी.एल. अँड एसी, असिस्टंट ट्रॅक, असिस्टंट टीआरडी, पॉईंट्समन बी ट्रॅक मेंटेनर आयव्ही.

दहावी, आयटीआय पात्रतेसाठी संधी
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड द्वारे उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता
निर्धारित केली आहे. विविध पदांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

3 Comments
  1. राहुल मोरे says

    माला रेल्वे मध्ये जॉब भेलेलं

  2. पारितोष बैकर says

    अर्ज कोणत्या site वर अपलोड करावा लागेल..?

  3. Vishal kangare says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.