Freshers साठी सुवर्ण संधी ;वर्ल्ड बँक इंटर्नशिप 2025 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या !
World Bank Internship 2025: Complete Information!!
वर्ल्ड बँक इंटर्नशिप अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना विविध प्रोफेशनल आणि टेक्निकल क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. यात अर्थशास्त्र आणि वित्त, मानवी विकास (सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लोकसंख्या), कृषी व पर्यावरण, अभियांत्रिकी व शहरी नियोजन, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तसेच खाजगी क्षेत्र विकास आणि कॉर्पोरेट समर्थन (हिशोबशास्त्र, संप्रेषण, मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान आणि वित्त) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
इंटर्नशिपसाठी पात्रता निकषांनुसार, उमेदवाराने पदवीधर असावे किंवा रेग्युलर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये नावनोंदणी केलेली असावी. इंग्रजी भाषेचे ज्ञान अनिवार्य असून, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी, पोर्तुगीज आणि चिनी भाषांचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच, कॉम्प्युटिंग आणि टेक्निकल कौशल्य आवश्यक आहे.
वर्ल्ड बँक इंटर्न्सना प्रति तास स्टायपेंड दिला जातो. याशिवाय, मॅनेजरच्या निर्णयानुसार, US$3,000 (सुमारे ₹2,60,590) पर्यंत प्रवास भत्ता मिळू शकतो, ज्यामध्ये ड्युटी स्टेशनपर्यंत आणि परत जाण्यासाठी विमान भाडे समाविष्ट असते. मात्र, निवासाची व्यवस्था उमेदवाराला स्वतः करावी लागते.
निवड प्रक्रियेनुसार, निवडलेल्या उमेदवारांना मार्च 2025 अखेरीस कळवले जाईल. त्यानंतर मुलाखत फेरी घेतली जाईल, आणि अंतिम निवड एप्रिल 2025 मध्ये केली जाईल. हा इंटर्नशिप प्रोग्राम मे 2025 मध्ये सुरू होईल आणि ऑगस्ट 2025 पर्यंत चालेल.
इच्छुक उमेदवारांना वर्ल्ड बँकेच्या अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी बायोडेटा, इंट्रेस्ट डिटेल्स आणि पदवी प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर अधिकृत ईमेल प्राप्त होईल. निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती मुख्यतः वॉशिंग्टन डीसीमध्ये होईल, तसेच काही जागतिक बँकेच्या विविध देशांतील कार्यालयांमध्येही संधी मिळू शकते.
या इंटर्नशिपद्वारे उमेदवारांना केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळणार नाही, तर त्यांच्या करिअरला नवीन दिशा मिळेल.