लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी मिळणार ? अक्षय तृतीयेलाही पैसे नाही आले !
महिला आपल्या एप्रिलचा हफ्ता कधी मिळणार याची वाट बघत आहे . आता तर अक्षय तृतीया पण झाली , तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत . वाचा खालील माहिती लाडकी बहिण योजना : अद्यापही एप्रिल हप्त्याची प्रतीक्षा, अदिती तटकरे यांचं वक्तव्य चर्चेत अक्षय्य तृतीयेला हप्ता खात्यात जमा होईल, असं सांगण्यात आलं होतं; मात्र अजूनही प्रतीक्षा सुरूच आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात वक्तव्य केल्यानंतर महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल,
मात्र ‘लवकरच’ म्हणजे नेमकं कधी, हे त्यांनी सांगितलेलं नाही.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीया सण (30 एप्रिल) रोजी हप्ता जमा होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. पण आज 1 मे उजाडूनही पैसे जमा झाल्याचं कोणतंही अपडेट नाही. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांचं लक्ष अजूनही त्या एका मेसेजकडेच आहे.
ही योजना महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद आहे. विधानसभा निवडणुकीत या योजनेने गेमचेंजर भूमिका बजावली होती. त्यावेळी आश्वासित केलेल्या 2100 रुपयांच्या हप्त्यावरून सध्या सरकारकडून स्पष्टता नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.