नवीन बातमी !! लाडकी बहीण योजनेत मार्चच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा, लाभार्थ्यांची चिंता!! – Waiting for March Installment, Beneficiaries Concerned!!
Waiting for March Installment, Beneficiaries Concerned!!
‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या कामाला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी स्थानिक अंगणवाडी सेविकांमुळे लाभार्थ्यांचा लाभ रद्द होत असल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाने आता हा अहवाल सेविकांऐवजी पर्यवेक्षिकांकडूनच मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
सन्मान निधीसाठी आणखी आठवड्याची प्रतीक्षा
राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ जानेवारी महिन्याचा सन्मान निधी मिळाला आहे. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. जागतिक महिला दिनाच्या दिवशी दोन्ही महिन्यांचा निधी वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र फेब्रुवारीचा निधीच जमा झाला. त्यामुळे महिलांना मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी आणखी एका आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महिला दिनी फक्त फेब्रुवारीचा निधी जमा
महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दोन महिन्यांचा निधी लवकरच वितरित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिला दिनी फक्त फेब्रुवारी महिन्याचा ₹1500 निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. मार्चचा निधी अद्याप वाटप न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवड्यात मार्च महिन्याचा निधी वितरण केला जाणार आहे.
पुण्यातील अनेक महिलांना जानेवारीपासून निधी नाही
पुणे जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना डिसेंबरनंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे अनुदान मिळालेले नाही. सरकारने फेब्रुवारीचा निधी जमा केल्यानंतरही दोन दिवस उलटले, तरी अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. यामुळे ‘काहींना लाभ, काहींना प्रतीक्षा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
निधी वितरण प्रक्रिया गतीमान करण्याची मागणी
राज्यातील लाखो महिला अजूनही सन्मान निधीच्या प्रतीक्षेत आहेत. लाभार्थ्यांना वेळेवर निधी मिळावा, यासाठी शासनाने वितरण प्रक्रिया गतीमान करण्याची गरज असल्याचे मत अनेक महिलांनी व्यक्त केले आहे.