मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे !

Verification of Beneficiaries Under Maji Ladki Bahin Yojana!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभार्थ्यांची तपासणी महिला व बालविकास विभागाद्वारे केली जात आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या ५ लाखांनी घटली आहे. योजना निकष पूर्ण न करणाऱ्या ५ लाख लाभार्थींची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महिला सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेतून मिळणाऱ्या रकमेबाबत शासन निर्णयात स्पष्ट उल्लेख आहे.

Verification of Beneficiaries Under Maji Ladki Bahin Yojana!

पीएम किसान, नमो शेतकरी लाभार्थींना किती पैसे मिळणार?

२८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून दरमहा १५०० रुपये म्हणजेच वार्षिक १८,००० रुपये दिले जातील. यातील ७ हप्त्यांचे १०,५०० रुपये लाभार्थींना वाटप झाले आहेत. योजनेच्या नियमांनुसार, पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी महिलांना प्रत्येकी ६,००० रुपये (एकूण १२,००० रुपये) मिळतात. त्यामुळे त्यांच्या थेट आर्थिक लाभाची रक्कम दरमहा १,००० रुपये राहते आणि उर्वरित रक्कम लाडकी बहिण योजनेतून दिली जाईल. म्हणजेच एखादी महिला शेतकरी असल्यास आणि तिला पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत ६,०००-६,००० रुपये मिळत असल्यास, तिला लाडकी बहिण योजनेतून दरमहा फक्त ५०० रुपये मिळतील.

अर्जांची स्क्रूटिनी सुरू

महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली जाते. डिसेंबर महिन्यात २ कोटी ४६ लाख महिलांना लाभ देण्यात आला होता. जानेवारी महिन्यात हा आकडा २ कोटी ४१ लाखांवर आला आहे. विभागाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून लाभार्थ्यांची स्क्रूटिनी सुरू असून, यासाठी परिवहन विभाग, कृषी विभाग आणि आयकर विभागाची मदत घेतली जात आहे.

अपात्र लाभार्थ्यांना पैसे परत करावे लागणार नाहीत

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, मात्र त्यांचा लाभ थांबवला जाईल.

अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला – २.३ लाख

६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला – १.१० लाख

कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा योजनेतून स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या महिला – १.६ लाख

एकूण अपात्र महिलांची संख्या – ५ लाख

Leave A Reply

Your email address will not be published.