जागतिक वैज्ञानिकांसाठी सुवर्णसंधी! ‘VAIBHAV फेलोशिप’ योजनेद्वारे भारतात संशोधनाची मोठी संधी; ४ लाख दरमहा मानधन !
VAIBHAV Fellowship: Global Talent to India!
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत ‘VAIBHAV फेलोशिप योजना २०२५’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश परदेशात कार्यरत असलेल्या अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे वैज्ञानिक तसेच भारतातील परदेशी नागरिक असलेल्या तज्ज्ञांना भारतात संशोधनासाठी आकर्षित करणे हा आहे. ही योजना भारतातील संशोधन संस्था व शैक्षणिक क्षेत्रात जागतिक दर्जाचे ज्ञान, कौशल्य व अनुभव घेऊन येईल.
फेलोशिपमध्ये दरमहा ४ लाखांचे मानधन, तीन वर्षांचा कालावधी
VAIBHAV फेलोशिप योजनेअंतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा ₹४ लाखांचे मानधन तीन वर्षांपर्यंत दिले जाणार आहे. यामुळे भारतात राहून संशोधन करणाऱ्या परदेशी वैज्ञानिकांना आर्थिकदृष्ट्या भक्कम आधार मिळेल. या योजनेद्वारे देशात गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी नवे मार्ग खुले होतील.
प्रवास व निवास भत्त्याचाही समावेश
फेलोशिप मानधनासोबतच वर्षातून एकदाच व्यवसाय वर्गातील आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचा खर्च, भारतात राहण्या दरम्यान प्रतिदिन ₹७,५०० पर्यंत निवास भत्ता, संशोधनासाठी ₹१ लाखाचा अतिरिक्त निधी आणि भारतात दोन संस्थांदरम्यान अकादमिक प्रवासासाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
फेलोला दरवर्षी १-२ महिने भारतात संशोधनासाठी संधी
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या वैज्ञानिकांना दरवर्षी किमान १ महिना आणि जास्तीत जास्त २ महिने भारतात राहून संशोधन व मार्गदर्शन करण्याची संधी मिळेल. हे वैज्ञानिको व भारतीय संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करेल आणि ज्ञान हस्तांतरणाला चालना मिळेल.
पात्रता आणि आवश्यक अटी
या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्यांकडे Ph.D., M.D., M.S., किंवा M.Tech पदवी असावी. त्यासोबतच परदेशात किमान ५ वर्षांचा संशोधन किंवा शिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेसाठी e-PMS पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. अंतिम अर्ज करण्याची तारीख ३० मे २०२५, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे पुरावे, अनुभवाचे दस्तऐवज, संशोधन प्रकाशन, प्रस्तावित संस्थेची संमती, स्वतःची सहमती, प्लेजरिझमचा नकार पत्र व इतर संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्ज पूर्णपणे स्पष्ट, पारदर्शक आणि तपशीलवार असणे अपेक्षित आहे.
भारतात वैज्ञानिक नवोन्मेषासाठी मोठा टप्पा
ही योजना भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर सहकार्य, मार्गदर्शन व कौशल्य हस्तांतरण घडवून आणणार आहे. भविष्यात भारतीय संशोधन आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात या योजनेमुळे दर्जेदार आणि दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात वैज्ञानिक प्रगतीचा नवा अध्याय सुरु!
VAIBHAV फेलोशिपमुळे परदेशस्थ भारतीय वैज्ञानिकांना मायदेशी योगदान देण्याची संधी मिळणार असून, देशातील संशोधन संस्थांना जागतिक दर्जाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. ही योजना भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे.