राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’

Vachan Prerna Din

Vachan Prerna Dinमाजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

या वर्षीही सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/ मंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.

15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन का साजरा केला जातो?

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम शेवटच्या श्‍वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते. म्हणूनच 15 ऑक्‍टोबर ही त्यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जावी याला विशेष औचित्य आहे. वाचन ही अशी सिद्धी आहे, की त्यामुळे आपल्याला एका हयातीत अनेक आयुष्ये जगता येतात. अनुभवविश्‍व व्यापक होतं. जाणीवा समृद्ध होतात. जीवनाचं आणि भवतालाचं आकलन अधिक सखोल होतं. मनाची अव्याहत मशागत करणारा आणि जीवनानुभवाचं अनवट दर्शन घडवणारा पुस्तकांसारखा दुसरा गुरू नाही. भाषेचा अभिजात गोडवा आणि आशयगर्भ कस याची नीजखूण वाचनामुळेच खोलवर पटत जाते.

Vachan Prerna Divas

वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत प्रसारमाध्यमांनी उचित दखल घेऊन त्यांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.