मुंबई महापालिकेतील ५२ हजार पदांची नवीन पदभरती त्वरित करणार?

Demand to Immediately Fill 52,000 Vacant Posts in Mumbai Municipal Corporation!!

सध्या BMC मध्ये भरपूर पदे रिक्त आहे. या मुले कामाचा टॅन खूप वाढला आहे आणि विविध कामे सुद्धा अडकलेली आहे. त्या मुळे, मुंबई महापालिकेतील विविध खात्यांमध्ये तब्बल ५२ हजार २२१ पदे रिक्त असून ही पदे तातडीने भरावीत, अशी जोरदार मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे. यासोबतच, पालिका प्रशासनाने या संदर्भात तातडीने संयुक्त बैठक बोलवावी, अशी विनंती सेनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून भरतीचा विषय अत्यंत गंभीर असल्याचे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे. या भरती संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. 

Demand to Immediately Fill 52,000 Vacant Posts in Mumbai Municipal Corporation!!

मुंबई पालिकेच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात विकासकामांची घोषणा करण्यात आली असली, तरी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही ठोस तरतूद केलेली नाही. विकासकामांना प्राधान्य देताना त्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचारी आणि कामगारांना मात्र दुर्लक्षित केले जात असल्याची टीका संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

इतर महत्त्वाच्या मागण्या
संघटनेने जुन्या पेन्शन योजनेची (ओपीएस) पुन्हा अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, गटविमा योजना सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी समान पद्धतीने लागू करावी, भत्तेवाढ २०१६ पासून लागू करावी, तसेच घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘सफाई कामगार’ घोषित करून त्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

पालिका प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन कर्मचारी व कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.