सरकारी नोकरीची सुवर्ण संधी “महिला व बालविकास विभागात २३६ पदांसाठी भरती!” आजच अर्ज करा
Vacancies for 236 Posts in Women and Child Development Department.
महिला व बालविकास विभागात विविध रिक्त पदांची सरळसेवा पद्धतीने भरती करण्यात येत आहे. यासाठी १०, १३ आणि १७ फेब्रुवारी रोजी २६ जिल्ह्यांतील ४५ केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा होणार असून, परीक्षेचे वेळापत्रक https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी म्हणून योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.
ही भरती संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लघुलेखक, वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक, सांख्यिकी सहाय्यक, काळजी वाहक, स्वयंपाकी अशा एकूण २३६ पदांसाठी होत आहे. ही परीक्षा टीसीएस मार्फत कॉम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेतली जाणार आहे. परीक्षार्थींच्या सोयीसाठी स्थानिक आणि जवळच्या केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर टीसीएस समवेक्षक, आयुक्तालय निरीक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नल जॅमर, बायोमेट्रिक ओळख, आय स्कॅनिंग आणि फेस रिडींग यंत्रणा कार्यरत असणार आहे. तसेच, पोलीस आयुक्त व अधिक्षकांना परीक्षेच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सहआयुक्त राहुल मोरे यांनी उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. जर कुणी गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत असेल, तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे किंवा 020-26333812 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मला मदतनीस मध्ये काम करायची इच्छा आहे आहे माझी इच्छा आहे मला तुमची मदत पाहिजे प्लीज सर मी बारावी शिक्षण झाले आहे आणि एम एस सी आय टी सुद्धा झालेला आहे
12th pass asel tr form fill kru shkto ka
Location kuthl ahe
Form kadhi bahryacha