आनंदाची बातमी!! विद्यापीठातील प्राध्यापक भरती सुरु ! जाणून घ्या – University Recruitment Boost !
University Recruitment Boost !
विद्यापीठातील संविधानिक पदभरती आणि प्राध्यापक भरती प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी अधिसभेच्या बैठकीत दिली. सोमवारी (ता. १६) तातडीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्राध्यापक भरतीसाठी मंजुरी देण्यात येणार आहे.
२०१७ पासून रखडलेल्या प्राध्यापक भरतीस आता गती मिळणार असून, २८९ पैकी १४० हून अधिक जागा रिक्त होत्या. शासनाच्या ८०% भरती निर्णयानुसार ७३ पूर्णवेळ शिक्षकांची भरती करण्यास मंजुरी मिळाली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीसाठी ५८१५ अर्ज आले होते, मात्र त्यावर स्थगिती आली होती. आता ती उठवण्यात आल्याने भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
याशिवाय, दहा संविधानिक पदभरती प्रक्रियेसाठी १५ एप्रिलपासून पुढील टप्पा सुरू होणार आहे. राज्य शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार नवीन जाहिरात प्रसिद्ध झाल्यास उमेदवारांना पुन्हा अर्ज करावे लागतील. विद्यापीठातील १६ संविधानिक अधिकाऱ्यांपैकी १२ पदे रिक्त असून, प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत ती सांभाळली जात आहेत.
संविधानिक व प्राध्यापक भरती प्रक्रियेला नव्या गतीने सुरुवात होत असल्याने अनेक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.