बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी !! युनियन बँकेत असिस्टंट मॅनेजर च्या ५०० पदांची भरती सुरु !-Union Bank Mega Recruitment!

Union Bank Mega Recruitment!

जर तुम्ही शासकीय बँकेत अधिकारी पदासाठी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने २०२५ साठी ५०० असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ३० एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून २० मे २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://www.unionbankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

Union Bank Mega Recruitment!

या भरतीअंतर्गत असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) आणि असिस्टंट मॅनेजर (IT) अशा दोन विभागांत प्रत्येकी २५० जागा, एकूण ५०० पदे भरली जाणार आहेत. त्यात सामान्य प्रवर्गासाठी २०६ जागा, OBC साठी १३४, SC साठी ७४, ST साठी ३६ आणि EWS साठी ५० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते ३० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचं झालं, तर क्रेडिट विभागासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि BCA/CMA/ICWA/CS आवश्यक आहे किंवा MBA/MMS/PGDM (Finance) मध्ये किमान ६०% गुण असावेत. IT पदासाठी BE/B.Tech/MCA/MSC (IT)/M.Tech (AI, Data Science, Cyber Security वगैरे) अशा शाखांतील पात्रता लागते.

या पदांकरिता दरमहा ₹48,480 ते ₹85,920 पर्यंत पगार दिला जाणार आहे. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडेल – ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. अर्जासाठी लागणारी फी SC/ST/PWD साठी ₹१७७ आणि General/OBC साठी ₹९९८ इतकी आहे.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक ही आहे – https://ibpsonline.ibps.in/ubisoapr25/.

ही संधी चुकवू नका – सरकारी नोकरीसाठी हीच योग्य वेळ आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.