मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा – प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद’ मॉल!

'Umed' Mall in Every District!

पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार, २५ लाख ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट ‘महालक्ष्मी सरस’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. राज्यभरातील बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी आणि विश्वासार्ह विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘उमेद’ मॉल उभारले जाणार आहेत.

'Umed' Mall in Every District!

हळूहळू संपूर्ण राज्यात हे मॉल्स सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच, पुढील काही काळात महाराष्ट्रात एक कोटी ‘लखपती दीदी’ घडवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सध्या राज्यात १८ लाख ‘लखपती दीदी’ कार्यरत असून, मार्चपर्यंत हा आकडा २५ लाखांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

वांद्रे-कुर्ला संकुल येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने ११ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन-२०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

स्त्रीशक्ती ही आर्थिक विकासाची खरी ताकद आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची चळवळ सुरू झाली असून, सरकारने महिलांसाठी ‘लेक लाडकी’, ‘लाडकी बहीण’ योजना, एस.टी. प्रवास सवलत यांसारख्या विविध योजना आणल्या आहेत. “लाडका भाऊ म्हणून आम्ही लाडक्या बहिणींच्या प्रगतीसाठी कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.