युको बँकेत 318 पदांची भरती सुरु, पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी!
UCO Bank Bharti 2025
मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न सत्यात उतरवू इच्छित असाल, तर यूको बँक तुमच्यासाठी एक मस्तच संधी घेऊन आली आहे. यूको बँकेने ११ राज्यांमध्ये लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीचे अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, यूको बँकेच्या अधिकृत वेबसाइट ucobank.com वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहे. यूको बँक लोकल बँक ऑफिसर पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ, महाविद्यालय किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांकडे मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच, उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करतो आहे, त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या संदर्भातील इतर तपशील उमेदवार अधिकृत भरती नोटिफिकेशनमधून तपशीलवार पाहू शकतात. यूको बँक एलबीओ भरती २०२५ हे एक सुवर्णसंधी आहे, ज्याचा उपयोग करून तुमचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा!
रिक्त पदांचा तपशिल : “स्थानिक बँक अधिकारी” पदांसाठी युनायटेड कमर्शियल बँकाने भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. एकूण २५० जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा २० ते ३० वर्षे असावी. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. अर्ज शुल्क SC/ST/PWBD उमेदवारांसाठी रु. १७५/- आहे, तर इतर सर्व उमेदवारांसाठी रु. ८५०/- आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.ucobank.com/ वर भेट द्यावी.
युको बँक लोकल बँक ऑफिसर भरतीच्या लेखी कशी होणार जाणून घेऊया :
अभ्यर्थ्यांकडून या परीक्षेत रीजनिंग आणि संगणक योग्यता, सामान्य/आर्थिक/बँकिंग जनजागृती, इंग्रजी भाषा, आणि डेटा विश्लेषण व अर्थ लावणे या विषयांवर आधारित एकूण २०० गुणांचे १५५ प्रश्न विचारले जातील.
- परीक्षेची कालावधी: ३ तास
- प्रत्येक विषयासाठी वेळेची मर्यादा: ठरवून दिलेली आहे.
- परीक्षेची भाषा: इंग्रजी किंवा हिंदी.
- निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांची कपात केली जाईल.
या भरतीशी संबंधित कोणतीही इतर माहिती जाणून घेण्यासाठी, उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
अर्ज कसा करावा : या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज संबंधित लिंकवरून सादर करावा आणि अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच , सरकारी नोकरीच्या इतर जाहिरातीं बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या news24.mahabharti.in या वेबसाइट ला रोज भेट दया.