खुशखबर !! आदिवासी विभाग भरती परीक्षेची तारीख जाहीर ; एकूण ६११ रिक्त पदे ! अधिकृत वेबसाईट ला भेट दया
Tribal Department Recruitment Exam!
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाने विविध पदांसाठी भरती परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षांचे आयोजन ९ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान विविध पदांसाठी होणार आहे. उमेदवारांनी आपली परीक्षा कोणत्या दिवशी आहे, हे तपासण्यासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (tribal.maharashtra.gov.in) भेट द्यावी.
या भरतीअंतर्गत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, मुख्य लिपिक, संशोधक सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, वरिष्ठ लिपिक, वार्डन आणि अधीक्षक अशा ६११ रिक्त पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेची सुरुवात ९ एप्रिल रोजी वॉर्डन आणि अधीक्षक पदांसाठी होईल, तर २५ एप्रिल रोजी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या परीक्षेसह संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईल.
या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागणार असून, त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उमेदवारांना परीक्षेच्या एक आठवडा आधी प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र आणि इतर महत्त्वाच्या सूचनांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी वेळेत अपडेट्स मिळवण्यासाठी संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.