आनंदाची बातमी !! SSC अंतर्गत 53 हजार हुन अधिक पदांची भरती सुरु ! चला तर मग करा अर्ज
The recruitment for more than 53,000 posts under SSC has begun
सरकारी नोकरीची अपेक्षा असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे . स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल ५३ हजार पदांची भरती होणार आहे . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा . SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) जीडी कॉन्स्टेबल भरतीसंदर्भात एक महत्त्वाची आणि उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
आयोगाने अधिकृतपणे जाहिर केले आहे की जीडी कॉन्स्टेबलच्या भरतीत 14,209 पदांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे एकूण रिक्त जागांची संख्या आता 53,690 इतकी झाली आहे. ही भरती BSF, CISF, SSB, ITBP, NCB, CRPF आणि Assam Rifles या सुरक्षा दलांमध्ये होणार असून, ही सुधारित रिक्तता लेखी परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना थेट फायदेशीर ठरणार आहे.
SSC ने ही माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचनेद्वारे जाहीर केली असून, इच्छुक उमेदवार ssc.gov.in वर जाऊन नवीन रिक्त जागांची यादी पाहू शकतात. यानंतर, CBT (कंप्युटर बेस्ड टेस्ट) पास झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यांसाठी – शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST) आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.
या चाचण्यांचे वेळापत्रक आणि केंद्रांची माहिती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर SSC च्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. ही पदसंख्या वाढ झाल्यामुळे सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या हजारो उमेदवारांच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.