ठाणे महापालिकेत सहायक आयुक्त रिक्त पदांची भरती सुरु !-Thane Appoints Assistant Commissioners
Thane Appoints Assistant Commissioners
ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त पदाच्या रिक्त जागा अखेर भरल्या आहेत. या पदांवर प्रतिनियुक्तीवर आलेले सात अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी शिवप्रसाद नागरगोजे, वर्तकनगर प्रभात समितीच्या सहायक आयुक्तपदी विजय कावळे.
लोकमान्य सावरकर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी सोमनाथ बनसोडे, आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी सोनल काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी ललिता जाधव यांची नियुक्ती कायम ठेवली असून, राजेंद्र गिरी यांना कळवा प्रभाग समितीचा कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, काही तासांतच खांदेपालट करून राजेंद्र गिरी यांना पुन्हा दिवा प्रभात समितीच्या कार्यालयीन अधीक्षकपदी आणि ललिता जाधव यांना कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले.
या बदलामुळे पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, कुप्रसिद्ध ओळख असलेल्या काही प्रभाग समित्यांमधील बदलाचे कारण विचारले जात आहे.