आनंदवार्ता !! राज्यात 4,435 प्राध्यापकांची भरती लवकरच ! जाणून घ्या सविस्तर माहिती
Teacher Recruitment Soon !
राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील 4,435 रिक्त अध्यापक पदे लवकरच भरली जाणार आहेत. वित्त विभागाकडे पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात दिली.
सार्वजनिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदे विविध कारणांमुळे रिक्त पडली आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार, उच्च शिक्षण संस्थांना किमान 75% अध्यापक नियमित नेमणे आवश्यक आहे. यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाने सूचना प्रसिद्ध करून संबंधितांकडून अभिप्राय मागविला आहे.
अकृषी विद्यापीठांतील 80% शिक्षकीय पदे भरण्यास मान्यता मिळाली असून, राज्यपालांच्या मंजुरीनंतर 28 फेब्रुवारी रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र, विद्यापीठांच्या कुलपतींनी काही अटींसह भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वित्त विभागाच्या सूचनांनुसार प्रस्तावात सुधारणा करून तो लवकरच पुन्हा सादर केला जाणार आहे, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.