आनंदची बातमी ; शिक्षक भरतीसाठी मुदतवाढ! – Teacher Recruitment Extended!
Teacher Recruitment Extended!
दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया कधी सुरू होईल, याकडे अनेक उमेदवार उत्सुकतेने पाहत आहेत. मात्र, अनेक संस्थांना जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरतीची संधी निर्माण होणार आहे.
या निर्णयाचे स्वागत जिल्हा परिषद मागासवर्गीय माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य नेते प्रवीण मेश्राम, राज्याध्यक्ष शालिनी बारसागडे, राज्य सहसचिव शेखर मेश्राम, जिल्हाध्यक्ष सदाशिव चव्हाण आणि जिल्हा सरचिटणीस गोवर्धन पाटील यांनी केले आहे.
भरती प्रक्रियेत गती
- २० जानेवारीपासून पोर्टल आणि सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
- २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील १,७१२ व्यवस्थापनांनी आणि विविध माध्यमांसाठी १,९०२ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे.
- काही संस्थांनी बिंदू नामावली प्रमाणित करण्यासाठी मागासवर्गीय कक्षात प्रस्ताव दाखल केले आहेत, मात्र काही व्यवस्थापनांची बिंदूनामावली अद्याप प्रमाणित न झाल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याच्या तारखेस मुदतवाढ देण्याची गरज भासली.
यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेला लवकरच गती मिळण्याची अपेक्षा आहे.