महत्वाचे! TCS मध्ये मोठी भरती सुरु! मेगा वॉक-इन ड्राईव्ह – १५ फेब्रुवारी २०२५! अर्ज केला का?

TCS Mega Walk-in Drive – February 15 2025

मित्रांनो, निकराच्या शोधात असेलेल्या मित्रांसाठी एक महत्वाची बातमी आहे! भारताची सर्वात मोठी IT सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) १५ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात मेगा वॉक-इन ड्राईव्ह आयोजित करत आहे. बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नोएडा आणि पुणे येथे विविध IT पदांसाठी भरती होणार आहे. हि भरती म्हणजे अनुभवी आणि फ्रेशर्स साठी एक सुवर्णसंधीच आहे. या भरती अंतर्गत पूर्ण भारतात विविध शहरात वॉक-इन ड्राईव्ह आयोजित केले आहे. याद्वारे आपण सरळ मुलाखत देऊन नोकरी मिळवू शकता. चला तर बघूया पूर्ण माहिती! 

TCS Mega Walk-in Drive – February 15 2025

TCS सोबत प्रगतीची संधी

TCS मध्ये काम करण्याची संधी म्हणजे जागतिक स्तरावरील IT प्रकल्पांमध्ये योगदान देण्याची आणि तंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्याची सुवर्णसंधी.
TCS ही २०२४ मध्ये जगातील सर्वात मूल्यवान IT सेवा ब्रँडपैकी एक आणि भारतातील सर्वात प्रतिष्ठित ब्रँड म्हणून ओळखली जाते.

भरतीसाठी उपलब्ध पदे:

Linux Administrator – Linux सर्व्हर व्यवस्थापन, समस्या निराकरण, प्रणाली मॉनिटरींग आणि देखभाल अनुभव आवश्यक.
SCCM Administrator – System Center Configuration Manager (SCCM), सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंट आणि पॅच व्यवस्थापन कौशल्य आवश्यक.
Network Data Specialist – डेटा नेटवर्क्स, राऊटर्स, स्विचेस आणि नेटवर्क परफॉर्मन्स मॉनिटरिंग मध्ये अनुभव असावा.
Network Security Specialist – नेटवर्क सुरक्षा प्रोटोकॉल, फायरवॉल्स आणि थ्रेट मॅनेजमेंट मध्ये प्राविण्य आवश्यक.
VMware Administrator – VMware तंत्रज्ञान, व्हर्च्युअलायझेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनातील अनुभव आवश्यक.
ServiceNow Administrator – ServiceNow प्लॅटफॉर्म व्यवस्थापन, वर्कफ्लो ऑटोमेशन आणि ITSM प्रक्रिया हाताळण्याचा अनुभव.
Active Directory Administrator – Active Directory व्यवस्थापन, ग्रुप पॉलिसी आणि वापरकर्ता खाती हाताळण्याचे कौशल्य.
Service Desk Support – उत्तम संवाद कौशल्य, तांत्रिक समस्या सोडवण्याचा अनुभव आणि ग्राहक समर्थन कौशल्य आवश्यक.

वॉक-इन ड्राईव्ह तपशील:

अनुभव आवश्यक: ४ ते १२ वर्षे
तारीख: १५ फेब्रुवारी २०२५ (शनिवार)
ठिकाण: संपूर्ण भारत – बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नोएडा, पुणे

स्थळविवरण:

बेंगळुरू:
TCS Ltd, अभिलाष बिल्डिंग, प्लॉट नं. ९६, रोड नं. २, इंडस्ट्रियल एरिया, व्हाईटफिल्ड – ५६००६६

चेन्नई:
TCS Ltd, ETL इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेड IT SEZ, २०० फूट रॅडियल रोड, पेरुंगुडी – ६०००९६

हैदराबाद:
TCS Ltd, कोहिनूर पार्क, प्लॉट नं. १, हायटेक सिटी रोड, रोड नं. १, हैदराबाद – ५०००८४

कोलकाता:
TCS Ltd, डेल्टा पार्क लॉर्ड्स, प्लॉट C, स्ट्रीट नं. ३०, सॉल्ट लेक सेक्टर V – ७०००९१

मुंबई:
TCS Ltd, ओलंपस, रोडास एन्क्लेव्ह, हिरानंदानी इस्टेट, ठाणे वेस्ट – ४००६०७

नोएडा:
TCS Ltd, यमुना टॉवर, प्लॉट नं. २२, नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे, सेक्टर १३५ – २०१३०१

पुणे:
TCS Ltd, सह्याद्री पार्क, प्लॉट नं. २ आणि ३, राजीव गांधी IT पार्क, हिंजवडी – ४११०५७

TCS विषयी थोडक्यात माहिती:

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही IT सेवा, कन्सल्टिंग आणि बिझनेस सोल्युशन्स कंपनी आहे.
५६ वर्षांहून अधिक काळ TCS ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांसोबत काम करून व्यवसाय, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सेवा पुरवण्यात आघाडीवर आहे.

या संधीचा लाभ घ्या!
अनुभवी उमेदवारांनी वॉक-इन ड्राईव्हला उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी TCS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.