आनंदाची बातमी !! शिक्षक भरती प्रक्रियेसाठी TAIT परीक्षेचे अर्ज सुरू झालेत ! चला तर मग अर्ज करा -TAIT Registration Begins!
TAIT Registration Begins!
महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षकांना आवश्यक असलेल्या “अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी” (TAIT) २४ मे ते ६ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ एप्रिलपासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार १० मे २०२५ पर्यंत आपला ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
या परीक्षेचा आयोजन IBPS संस्थेद्वारे करण्यात येणार असून, उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांमध्ये परीक्षा देण्याची मुभा असेल. २०० गुणांच्या या परीक्षेत १२० गुण अभियोग्यता चाचणीसाठी तर ८० गुण बुद्धिमापनासाठी ठेवण्यात आले आहेत. परीक्षेची वेळ दोन तासांची असणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, उमेदवारांनी अर्ज करताना नावाची नोंद आधार कार्डप्रमाणे करावी लागणार आहे. नावात तफावत आढळल्यास परीक्षा देता येणार नाही. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी तीन परीक्षा केंद्रांची निवड करावी लागणार आहे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले.
ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना शुल्क आकारले जाणार असून, अनारक्षित प्रवर्गासाठी ९५० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ८५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मराठी व इंग्रजी भाषिक क्षमतेच्या प्रश्नांशिवाय इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील.
अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.