स्टेनोग्राफर पदांच्या भरती चा मुहूर्त निघाला! जाणून घ्या कधी पासून येणार अर्ज!

Maharashtra Stenographer Recruitment 2025

 राज्यातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये लघुलेखक संवर्गातील अनेक पदे रिक्त असून, ही पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Stenographer Recruitment 2025

 Demand for Stenographer Recruitment

खासदार लंके यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, लघुलेखकांच्या जागा रिक्त असल्याने अन्य कर्मचाऱ्यांकडून ही कामे केली जात आहेत, त्यामुळे लघुलेखन पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. लघुलेखन ही एक विशेष कौशल्याधारित पद आहे, त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांना या पदाचा कार्यभार देणे योग्य नाही. राज्यभर अनेक बेरोजगार युवक-युवती लघुलेखन क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधत आहेत, तसेच काहीजण पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कामकाजात सुलभता व बेरोजगारांना संधी

लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि स्वीय सहाय्यक यांसारख्या रिक्त पदांची पदोन्नती किंवा थेट भरतीद्वारे तातडीने भरती करण्याची मागणी लंके यांनी केली. यामुळे सरकारी कामकाज अधिक कार्यक्षम होईल आणि बेरोजगार युवक-युवतींना शासन सेवेतील संधी उपलब्ध होईल.

लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया लवकर राबवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) दर तीन वर्षांनी उच्च व निम्न श्रेणी लघुलेखक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत असते. २०१८ मध्ये झालेल्या भरतीनंतर पुढील भरती २०२१ मध्ये अपेक्षित होती. मात्र, कोविड-१९ महामारीमुळे ती २०२२ मध्ये पुढे ढकलली गेली. यामुळे २०२५ मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण

गेल्या दोन वर्षांपासून अनेक विद्यार्थी लघुलेखक परीक्षेची तयारी करत आहेत, मात्र भरती प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे त्यांच्यात उदासिनता वाढत आहे. बेरोजगारी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वय वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा ताण येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार लंके यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.