राज्यातील पहिले थ्रीडी पोस्ट ऑफिस पुण्यात होणार

State's 1st 3D Post Office In Pune

State’s 1st 3D Post Office In Pune: आधुनिक आणि थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील पहिले थ्रीडी टपाल कार्यालय सहकारनगमध्ये उभे राहणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, लवकरच कामाला सुरुवात होईल. यापूर्वी बंगळूरूमध्ये देशातील पहिले या प्रकारचे टपाल कार्यालय बांधण्यात आले आहे. टपाल कार्यालयाच्या पुणे शहर पश्चिम विभागाच्या अधीक्षक रिपन ड्युलेट यांनी ही माहिती दिली. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन टपाल कार्यालयाने गेल्या काही वर्षांत उपनगरांमध्ये नवीन टपाल कार्यालये सुरू केली आहेत. या वर्षभरातही आंबेगाव, बावधन, शिवाजीनगर, सहकारनगरमध्ये नवीन टपाल कार्यालये सुरू होत आहेत.

यातील सहकारनगरला 411072 हा नवीन पिनकोड मिळाला आहे. तेथे खात्याची स्वत:ची जागा असल्याने पुण्यातील पहिले थ्रीडी प्रकारातील टपाल कार्यालय बांधण्यात येणार आहे. या बांधणीप्रक्रियेत आधुनिक थ्रीडी प्रिंटिंगचा वापर केला जातो. आधुनिक डिझाइन पद्धतीने वास्तूचा आकार निश्चित करून माणसांच्या कमीत कमी सहभागातून कमी दिवसांत ही इमारत उभी राहते. देशात ही संकल्पना नवीन असून, बंगळूरूमध्ये गेल्या वर्षी टपाल कार्यालयाची पहिली इमारत बांधण्यात आल्याचे रिपन यांनी सांगितले. दरम्यान, पुढील महिनाभर आम्ही परदेशांतील दिवाळी फराळ कुरिअर सेवेवर लक्ष केंद्रित करणार आहोत.

गेल्या वर्षी आम्ही नव्याने या उपक्रमाला सुरुवात केली आणि पहिल्याच वर्षी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आमच्या विभागाला 50 लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे यंदा फराळाच्या पॅकिंगपासूनची सेवा टपाल कार्यालयात सुरू केली आहे. नागरिकांना 130 देशांत फराळ पाठवण्याची, एवढेच नव्हे तर घरी येऊन फराळ साहित्य घेऊन जाण्याची सुविधाही आम्ही उपलब्ध केली आहे. या दिवाळीत 1 कोटीच्या उत्पन्नाचे ध्येय आम्ही निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.