१० वी पाससाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये तब्बल ३९,४८१ जागांसाठी मेगाभरती सुरु!
SSC GD Bharti For 39481 Posts
स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे कर्मचारी निवड आयोगात नोकरीची संधी आहे. कर्मचारी निवड आयोगात तब्बल ३९,४८१ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF), ITBP ही पदे भरती केली जाणार आहे.
१० पास उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शनद्वारे ३९,४८१ पदांची मोठी पदभरती सुरु!
सचिवालय सुरक्षा दल (SSF), रायफलमन, NCB मध्ये शिपाई पदासाठी भरती सुरु झाली आहे. या नोकरीसाठी १० वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात.
स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. नोकरीसाठी १०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. १८ ते २३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित टेस्ट घेऊन करण्यात येणार आहे. त्यानंतर शारीरिक टेस्ट, वैद्यकीय तपासणीनंतर कागदपत्रे पडताळणी केली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२४ आहे.