आनंदवार्ता!! रेल्वेत १० वी उत्तीर्णांसाठी तब्ब्ल 835 रिक्त जागांची भरती; आजच करा अर्ज !
South East Central Railway Apprentice!
आजच नवीन महत्वाची जाहिरात प्रकाशित झाली ! १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी चालून आलेली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी ८३५ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती रेल्वे अधिनियम १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण (NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून) असणे बंधनकारक आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी असू शकते, त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे ठरवण्यात आली आहे. SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे वयोसवलत, OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे वयोसवलत, तसेच दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी शासन नियमांनुसार अतिरिक्त सवलत लागू असेल. उमेदवारांची निवड प्रक्रिया कोणत्याही लेखी परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय थेट मेरिट लिस्टद्वारे होणार आहे, जिथे दहावी आणि ITI मधील गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
शिकाऊ उमेदवारांना रेल्वे नियमानुसार स्टायपेंड दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, त्यानंतर भरतीच्या अर्ज लिंकवर क्लिक करून लॉग इन करावे, आवश्यक माहिती भरावी, शुल्क भरून कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करावा. अर्जाची प्रत भविष्यासाठी डाउनलोड करून ठेवावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२५ आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात (PDF) वाचावी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY लिंकवर क्लिक करावे. अर्ज करताना सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
अशाच नवीन प्रकशित झालेल्या जाहिरातीं बद्दल जाणून घेण्यासाठी news24.mahabharti.in ला रोज भेट दया.
No
Hi bharti kothe aahe va ajun mahiti ky aahe
Hi bharti kothe aahe va purn mahiti ky aahe
ITI करणे आवश्यक आहे का❓