नवीन जाहिरात प्रकाशित; समाज कल्याण विभागात ४ मार्चपासून नवीन भरती सुरु होणार आहे.

Social Welfare Department Recruitment Process to Start from March 4!!

समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ऑनलाइन परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. उमेदवारांना २५ फेब्रुवारीपासून ऑनलाइन प्रवेश पत्र (हॉल तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. भरती प्रक्रियेबाबत कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास उमेदवारांनी ९१-९९८६६३८९०९ या क्रमांकावर संपर्क साधावा. हा हेल्पलाइन क्रमांक सोमवार ते शनिवार, सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत कार्यरत असेल.

Social Welfare Department Recruitment Process to Start from March 4!!

अफवांवर विश्वास ठेवू नका – समाज कल्याण विभागाचा इशारा
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. जर कोणी नोकरी मिळवून देण्याचे किंवा परीक्षा पास करून देण्याचे आमिष दाखवले, तर त्याची त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

ऑनलाइन परीक्षा वेळापत्रक आणि प्रवेश पत्र
ही कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा ४ ते १९ मार्च २०२५ या कालावधीत विविध सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, अधीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक या पदांसाठी परीक्षा होईल.

अर्जदारांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://sjsa.maharashtra.gov.in) भेट द्यावी. तसेच, ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.