स्टेट बँके मध्ये १,५११ पदांची बंपर भरती सुरु, नवीन जाहिरात प्रकाशित!
SBI SCO Recruitment
मित्रांनो, SBI हि भारतातली सर्वात टॉपची बँक आहे, याच देशातील सर्वात मोठ्या बँक भारतीय स्टेट बँके (SBI SCO Recruitment) ने देशभरातील वेगवेगळ्या शाखांसाठी स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. डिप्टी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर अशा 1511 पदांवर भरती केली जाणार आहे. तसेच यासाठी आजपासून म्हणजेच 14 सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तसेच मित्रांनो, लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत असणार आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे उमेदवारांना एकाहून अधिक पदासाठी अर्ज करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- पदाचे नाव – स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) – डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम)
- पदसंख्या – 1511 जागा
पदे कोणती आहेत?
1. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – प्रोजेक्ट मॅनेजमेंट– 187 पदे
2. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – इंफ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन – 412 पदे
3. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – 80
4. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) आयटी – आर्किटेक्ट – 27
5. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) इन्फॉर्मेशन सेक्युरिटी – 7
6. असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) – 784
7. बॅकलॉग व्हॅकंसी- असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) – 14
वर नमूद केलेल्या पदांमध्ये, पहिल्या पाच प्रकारच्या पदांसाठी ठेवण्यात आलेली वयोमर्यादा 25-35 वर्षे आहे. तर सहाव्या आणि सातव्या प्रकारच्या पदांसाठी वयोमर्यादा 21-30 वर्षे आहे. निवडलेल्या उमेदवारांना पहिल्यांदा एका वर्षाच्या प्रोबेशन कालावधीवर ठेवण्यात येईल. या कालावधीत त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. बँकेच्या स्टँरर्डनुसार सेवा आढळल्यास, त्यांची सेवा स्पेशालिस्ट कॅडर अंतर्गत निश्चित केली जाईल. असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) ग्रेड – JMGS-I हे पद असेल. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना जॉईन होताना 2 लाख रुपयांचा बाँड भरावा लागेल. याअंतर्गत किमान पाच वर्षे बँकेत काम करणे बंधनकारक असेल.