तरुणांसाठी सुवर्ण संधी !! SBI यूथ फॉर इंडिया फेलोशिप 2025-26 सुरु ; दरमहा स्टायपेंड मिळेल ! आता अर्ज करा

SBI Paid Internship !

SBI यूथ फॉर इंडिया फेलोशिप 2025-26 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एसबीआय फाउंडेशन ग्रामीण भारतात सामाजिक परिवर्तन घडवण्यास इच्छुक तरुणांसाठी ही सुवर्णसंधी देत आहे. १३ महिन्यांच्या या फेलोशिपमध्ये उमेदवारांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल, तसेच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी youthforindia.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

SBI Paid Internship !

पात्रता आणि आवश्यक अटी

या फेलोशिपसाठी भारतीय, नेपाळ किंवा भूतानचे नागरिक तसेच OCI धारक अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे १ ऑक्टोबर २०२५ पूर्वी कोणत्याही विषयातील बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच, वयोमर्यादा २१ ते ३२ वर्षे आहे.

स्टायपेंड आणि इतर फायदे

ही पेड फेलोशिप असल्याने उमेदवारांना दरमहा ठराविक स्टायपेंड दिला जाईल. तसेच, प्रवास भत्ता आणि प्रोजेक्ट खर्चासाठी अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल.

अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धत

  1. youthforindia.org वर जा आणि “Apply Now” वर क्लिक करा.
  2. खाते तयार करून ऑनलाईन अर्ज भरा.
  3. शैक्षणिक पात्रता, कार्यअनुभव आणि उद्दिष्टांबाबत माहिती भरा.
  4. ऑनलाईन मूल्यांकन पूर्ण करा.
  5. निवड झालेल्या उमेदवारांना व्यक्तिगत मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

नव्या संधीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे! आजच अर्ज करा!

Leave A Reply

Your email address will not be published.