खुशखबर!- समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती – Samaj Kalyan ayuktalay bharti

Samaj Kalyan ayuktalay bharti

मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २९९ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्तालयात लघुटंकलेखक (स्टेनो टायपिस्ट), लोवर ग्रेड स्टेनो, हायर ग्रेड स्टेनो, वॉर्डन, सोशल वेल्फेअर इन्स्पेक्टर, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनो टायपिस्ट पदासाठी उमेदवाराने १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत त्याच्याकडे इंग्लिश आणि मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असायला हवे.

Samaj Kalyan ayuktalay bharti

 

या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांनी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवरांची निवड केली जाणार आहे.

 

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १,००० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.या नोकरीसाठी तुम्हाला https://sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ११ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

3 Comments
  1. Varsha Balu Mohite says

    Sarakari noukari aahe ka, ani mazyakade sc caste certificate nahi tr kay karava ,maze B.com.zale aahe pls reply kuthe pahayala milel

  2. Nikhil shrihari mohod says

    Sir mala kute midel duvty

  3. राम येल्लेवार says

    कोणतेही भरती जाहिरात काढतांनी किमान सामान्य युवा युवतींचा पण विचार करावा कारण 900-1000-500 हे शुल्क सामान्य लोकांकारिता नाही किमान् सर्वा युवा युवतींना फक्त शुल्क 100₹ इतकेच आकरन्यात् यावे.वयो मर्यादा किमान 21 ते 45 पर्यंत घ्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.