२३,८२० पदांची सफाई कर्मचाऱ्यांची मोठी पदभरती जाहिरात आली, अर्ज ७ ऑक्टोबर पासून!
Safai Karmchari Bharti
मित्रांनो, सध्या सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक तरुण धडपड करत आहे. अशात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची आणि मोठी भरती समोर आली आहे. हि भरती १० वी पास उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना कोणत्याही वयाची अट नाही. तसेच कोणतेही परीक्षा देण्याची देखील गरज नाही. चला तर मग या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. स्वायत्त शासन विभागाने ही भरती आणली आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती देण्यात आलीये. सफाई कामगार या पदासाठी ही भरती आहे. एकूण २३,८२० पदांसाठीची ही भरती राजस्थान या राज्यातील आहे. तुम्हालाही सफाई कर्मताऱ्याची नोकरी पाहिजे असेल तर https://lsg.urban.rajasthan.gov.in/ या संकेत स्थळाला सर्वात आधी भेट द्या. याची लिंक आणि जाहिरात आम्ही खाली दिलेली आहे. येथे तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येईल.
अर्ज करण्याची तारीख
सदर पदासाठी तुम्ही ७ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता.तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर आहे. फॉर्म भरताना त्यात काही चुका झाल्यास त्यात दुरुस्ती करण्यासाठी ११ ते २५ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे.
वयाची अट काय?
या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला वयाची अट देण्यात आली आहे. Safai Karamchari Bharti 2024) भरती होताना तुम्हाला १ जानेवारी २०२५ पर्यंत कमीतमी १८ वर्षे पूर्ण असली पाहिजेत. यामध्ये ४० वर्षांहून अधिक व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत. आरक्षित वर्गातील उमेदवारांना ही सूट दिली जाईल.
फॉर्म फी किती?
सदर भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला ६०० रुपये फी भरावी लागेल. दिव्यांग उमेदवारांसाठी ४०० रुपये फी आहे.
या व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत
सफाई कर्मचारी पदाची ही भरती फक्त राजस्थानमधील नागरिकांसाठी आहे. येथील रहिवासीच या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये उमेदवारांची निवड लॉटरी नुसार केली जाणार आहे. उमेदवाराला यात सार्वजनिक सफाई कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे महत्वाचं आहे. नगर पालिका, नगर परिषद यांकडून सार्वजनिक स्वच्छता केल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
Not