आरटीई प्रवेश: २५% आरक्षणासाठी ऑनलाईन सोडत जाहीर!

RTE Admission: Online Lottery Announced for Reserved Seats!

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५% राखीव जागांसाठी आलेल्या अर्जांची ऑनलाईन सोडत (लॉटरी) सोमवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडली. राज्यातील ८,८६३ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या १,०९,१११ जागांसाठी तब्बल ३,०५,१५९ अर्ज आले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाने ऑनलाईन सोडत जाहीर केली असली तरी पालकांना प्रवेशाच्या निवड यादीसाठी शनिवार (१५ तारखे) पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

RTE Admission: Online Lottery Announced for Reserved Seats!

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या चिठ्ठ्यांद्वारे काही तांत्रिक सूत्रांचा वापर करून राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) सोडतीची प्रक्रिया पूर्ण करते. या प्रक्रियेसाठी ३-४ दिवस लागतात. अंदाजे १४ आणि १५ फेब्रुवारीदरम्यान NIC कडून तांत्रिक काम पूर्ण होईल. त्यानंतर, शनिवारी (१५ फेब्रुवारी) पासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेशाबाबत संदेश पाठविण्यात येतील.

पालकांनी निर्भयपणे तक्रारी नोंदवा: शिक्षण आयुक्तांचा सल्ला

आरटीई अंतर्गत २५% आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे पालकांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये. जर कोणी एजंट आरटीई प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत असेल, तर त्याची तक्रार त्वरित शिक्षण अधिकाऱ्यांकडे करावी. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.

तसेच, जर कोणतीही शाळा आरटीई प्रवेश नाकारत असेल, तर पालकांनी निर्भयपणे तक्रार करावी. काही शाळा नववी इयत्तेनंतर थेट ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) देतात. अशा प्रकारच्या तक्रारींसाठीही पालकांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण विभागाकडून नक्कीच या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.