खुशखबर!! RTE प्रवेशासाठी मुदतवाढ दिली !-RTE Admission Deadline Extended!
RTE Admission Deadline Extended!
राज्यातील आरटीई २०२५-२६ प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ६२७ शाळांमध्ये ११,३२२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, २५,७७४ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.
पहिल्या टप्प्यात १०,४२९ विद्यार्थ्यांची निवड झाली असली तरी, त्यातील फक्त ५,११३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही १,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत, त्यामुळे पालकांना आणखी वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर आणि आवश्यक कागदपत्रांसह १ एप्रिलपूर्वी जवळच्या पडताळणी केंद्रात जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शाळांमधील रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएस पाठवले जातील, मात्र पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ टॅब तपासून अर्जाची स्थिती नियमितपणे पाहणे आवश्यक आहे.