खुशखबर !! RTE ची तिसरी यादी जाहीर!-RTE 3rd List Out !
RTE 3rd List Out!
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आरटीई कायद्यानुसार सुरू असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एक टप्पा अजून पार पडला. तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर झाली असून त्यामध्ये २४८२ विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. यादी लागल्याबरोबर लगेच प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण १ लाख ४० हजार ४०४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यातील ८६ हजार ५४८ मुलांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. पण अजून बऱ्याच मुलांनी प्रवेश घेतलेला नाही, असं आकडेवारीतून दिसून येतंय.
दुसऱ्या प्रतीक्षा यादीची मुदत संपल्यानंतर तिसरी यादी लावण्यात आली. आता अजून काही जागा शिल्लक असल्याने चौथी प्रतीक्षा यादीही लवकरच येणार आहे. त्यामुळे ज्यांचा अजून प्रवेश झालेला नाही, अशा पालकांनी आरटीईची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी तपासावी. आपल्या पाल्याचं नाव यादीत आल्यास, दिलेल्या वेळेत शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा, असं आवाहन शिक्षण खात्याने केलं आहे.