नवीन अपडेट!! मुंबई विद्यापीठात रोबोटिक्स प्रोग्रामिंग/ऑपरेटर प्रशिक्षण ! | Robotics Revolution at Mumbai University!

Robotics Revolution at Mumbai University!

मुंबई विद्यापीठाने रोबोटिक्स आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड एआय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथून एमटेक इन रोबोटिक्स हा नवीन अभ्यासक्रम २०२५-२६ पासून सुरू होणार आहे.

Robotics Revolution at Mumbai University!

विद्यापीठाच्या कल्याण येथील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस येथे हे केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ आणि ‘जॅन्युटेक इंडस्ट्री’ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.

हे अत्याधुनिक केंद्र ४५ हजार चौरस फुटांच्या परिसरात उभारले जाणार असून, रोबोटिक्स, एआय आणि औद्योगिक ऑटोमेशनसाठी संशोधन, विकास आणि प्रशिक्षण यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजनही केले जाईल.

कराराच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ आणि जॅन्युटेक इंडस्ट्री संयुक्तपणे प्रमाणित रोबोटिक्स प्रोग्रामिंग/ऑपरेटर प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहेत. औद्योगिक गरजा आणि संशोधनावर भर देत विद्यापीठ शैक्षणिक कौशल्ये आणि संशोधन क्षमता वाढविण्यास मदत करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.