सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती सुरु, नवीन जाहिरात आली!

Recruitment in Mangalwedha Taluka.

महिलांनो खुशखबर! सोलापूर जिल्ह्यातील  मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावांत अंगणवाडीत सेविका आणि मदतनीस भरती सुरू; लगेच अर्ज करा!मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, रहाटेवाडी, सलगर खुर्द, लक्ष्मीदहिवडी, अकोला आणि जित्ती या सहा गावांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती केली जात आहे, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारोळे यांनी दिली आहे. हि भरती जाहीरात आणि अर्जाची लिंक आम्ही खाली दिलीये. 

Recruitment in Mangalwedha Taluka.

या भरतीसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून १० फेब्रुवारीपासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. अर्जांची छाननी ५ मार्च रोजी, प्राथमिक गुणवत्ता यादी १९ मार्च रोजी, त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी अंतिम मुदत २५ मार्च, आणि २५ मार्च रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भरतीसाठी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, अर्जासोबत गुणपत्रिका, पदवी/पदव्युत्तर शिक्षण प्रमाणपत्रे (डी.एड., बी.एड., एम.एससी., आयटी इत्यादी), जात प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र, तसेच स्थानिक रहिवाशी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत किमान १८ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे आहे. मात्र विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहील. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, आणि दोन अपत्याची अट पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा?

पात्र उमेदवारांनी आपले अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे नियोजित वेळेत दाखल करावेत.

1 Comment
  1. Chandni saifan shaikh says

    Mala aanganwadi sevikache kam karayche aahe majhe sevikache sartificet pan aahe

Leave A Reply

Your email address will not be published.