नवीन भरती !! नॅशनल एअरोस्पेस लॅब अंतर्गत ४३ टेक्निकल असिस्टंट पदांची भरती! | Recruitment for 43 Technical Assistant Posts!

Recruitment for 43 Technical Assistant Posts!

नॅशनल एअरोस्पेस लॅबमध्ये संधी
सीएसआयआर-नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरी (NAL) मार्फत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत ४३ टेक्निकल असिस्टंट पदांसाठी थेट भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

 Recruitment for 43 Technical Assistant Posts!

विभागवार पदसंख्या जाहीर
इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, मेटॅलर्जी, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, मल्टिमिडीया आदी शाखांमध्ये पदे उपलब्ध आहेत. यासाठी संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा बी.एससी. पदवी आवश्यक आहे.

अनुभवासह पात्रता महत्त्वाची
इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी डिप्लोमाधारकांना दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तर काही पदांसाठी बी.एससी. पदवीधरांना एक वर्षाचा अनुभव किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी
उमेदवारांचे वय ११ एप्रिल २०२५ रोजी २८ वर्षांच्या आत असावे. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर ६ नुसार ₹३५,४०० – ₹१,१२,४०० पर्यंत वेतन मिळणार असून, अंदाजे मासिक वेतन ₹७०,००० असेल.

निवड प्रक्रियेची माहिती
शॉर्टलिस्टेड उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलावले जाईल. ती उत्तीर्ण झाल्यावर लेखी परीक्षा (OMR किंवा CBT) होईल. परीक्षेत २०० बहुपर्यायी प्रश्न असतील आणि वेळ ३ तास राहील. अंतिम निवड ही लेखी परीक्षेच्या गुणांवर होईल.

ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख!
अर्ज शुल्क ₹५०० असून, उमेदवारांना State Bank Collect Web Page द्वारे भरावे लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२५ (सायं. ५ वाजेपर्यंत) असून, अर्ज www.nal.res.in वर सादर करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.