नवीन जाहिरात ;भारतीय टपाल विभाग GDS येथे ग्रामीण सेवक पदांची भरती ! अर्ज सादर करा
Recruitment for Gramin Dak Sevak in the Indian Postal Department !
भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. नवी मुंबई टपाल विभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण २१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च २०२५ पर्यंत indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई डाकघर विभागाने कळवले आहे.
महत्त्वाच्या सूचना:
गोपनीयता राखा: उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी कोणासोबतही शेअर करू नये.
फसवणुकीपासून सावध रहा: कोणत्याही संशयास्पद किंवा फसवणूक करणाऱ्या दूरध्वनी/भ्रमणध्वनी कॉल्सपासून सावधगिरी बाळगा.
अधिकृत माहिती मिळवा: भरतीविषयी अधिक माहितीसाठी www.indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा संबंधित टपाल कार्यालयाशी संपर्क साधा.
नवी मुंबई टपाल विभागाच्या वतीने पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.