RBI कडून ८ सहकारी बँकांना दंड!-RBI Penalizes 8 Co-op Banks!
RBI Penalizes 8 Co-op Banks!
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ८ सहकारी बँकांवर विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यामध्ये कांग्रा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेला सर्वाधिक ₹२५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दंडित बँका:
- सिटीझन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, जालंधर (₹१५ लाख) – RBI च्या ‘Supervisory Action Framework (SAF)’ च्या नियमांचे उल्लंघन.
- संत्रामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरात (₹१ लाख) – KYC आणि व्याज दर नियमांचे पालन न केल्याबद्दल.
- पोरबंदर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरात & वेल्लोर को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, तामिळनाडू (₹५०,००० प्रत्येकी) – KYC नियमांचे उल्लंघन.
- म्हैसूर आणि चामराजनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक, कर्नाटक (₹१ लाख) – बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९ च्या कलम २० आणि ५६ च्या उल्लंघनामुळे.
- साउथ कॅनरा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक, कर्नाटक (₹५ लाख) – बँकिंग रेग्युलेशन कायद्याचे उल्लंघन.
- कोडुंगलूर टाऊन को-ऑपरेटिव्ह बँक, केरळ (₹१ लाख) – कर्ज व्यवस्थापन, मालमत्तेचे वर्गीकरण आणि व्याजदरांवरील नियमांचे उल्लंघन.
RBI च्या २७ मार्च २०२५ च्या आदेशानुसार, या बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.