RBI मध्ये डायरेक्ट जॉब नो एक्झाम!-RBI Job No Exam, High Pay!

RBI Job No Exam, High Pay!

री नोकरी हवीय आणि ती पण थेट – मग ही बातमी तुमच्यासाठीच! रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये संपर्क अधिकारी या पदासाठी नो एक्झाम डायरेक्ट भरती होणार आहे. आणि पगार? थेट 2.73 लाखांपर्यंत!

RBI Job No Exam, High Pay!आरबीआयने अनुभवी प्रोफेशनल्ससाठी ही संधी ओपन केलीय. संपर्क अधिकारी म्हणून उच्च अधिकाऱ्यांशी, सरकारी संस्था आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांशी कनेक्ट ठेवणं हे मुख्य काम असेल.

या भरतीत एकूण 4 जागा आहेत. उमेदवार भारतीय नागरिक असावा, वय 50 ते 63 दरम्यान आणि मुंबईतल्या पब्लिक बँक किंवा आरबीआयमध्ये कमीत कमी 3 वर्षांचा थेट अनुभव असावा. म्हणजे, ज्यांनी बँकेत आधी काम केलंय आणि आता रिटायर्ड आहेत, त्यांच्यासाठी ही भन्नाट संधी आहे!

💼 लाभ काय काय?

  • महिन्याला साडे दोन लाखांहून अधिक पगार

  • प्रवास भत्ता (TA/HA), मोबाइल फोन, जेवण भत्ता (सोडेक्सो)

  • लाईफस्टाइल पण झकास!

📨 अर्ज कसा करायचा?

  • अर्जाची हार्ड कॉपी पोस्ट/हाताने मुंबई RBI ऑफिसमध्ये द्या

  • त्याची सॉफ्ट कॉपी आणि कागदपत्रं ई-मेल करा: [email protected]

  • शेवटची तारीख: 14 जुलै 2025

Leave A Reply

Your email address will not be published.