RBI मध्ये पदवीधरांसाठी संधी!-RBI Hiring: 28 Posts Open!
RBI Hiring: 28 Posts Open!
Table of Contents
बघा ना, ज्यांना सरकारी नोकरीचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी RBI कडून धमाकेदार भरती जाहीर झाली आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 28 पदं रिक्त आहेत आणि ती भरली जाणार आहेत थेट भारतीय रिझर्व्ह बँकेत!
ही भरती लीगल ऑफिसर, मॅनेजर (सिव्हिल व इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (राजभाषा आणि सुरक्षा) या विविध पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
पदसंख्या आणि पात्रता थोडक्यात:
-
लीगल ऑफिसर (ग्रेड B): 5 जागा | विधी पदवी | 2 वर्षे अनुभव
-
मॅनेजर – सिव्हिल (ग्रेड B): 6 जागा | सिव्हिल इंजिनिअरिंग | 3 वर्षे अनुभव
-
मॅनेजर – इलेक्ट्रिकल (ग्रेड B): 4 जागा | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग | 3 वर्षे अनुभव
-
असिस्टंट मॅनेजर – राजभाषा (ग्रेड A): 3 जागा | हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर
-
असिस्टंट मॅनेजर – प्रोटोकॉल व सुरक्षा (ग्रेड A): 10 जागा | माजी कमिशन्ड अधिकारी
महत्त्वाच्या तारखा:
-
अर्जाची अंतिम तारीख: 31 जुलै 2025
-
वयाची अट (पदानुसार): 21 ते 40 वर्षांपर्यंत
-
फी: ₹600 (GEN/OBC/EWS), ₹100 (SC/ST/PWD) + GST