महत्वाचे !! रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणे आवश्यक !

Last Chance for Ration Card e-KYC!

केवायसी न केल्यास अन्नधान्य बंद?
महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली असून, त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अनुदानित अन्नधान्य मिळणे बंद होऊ शकते. तसेच, ई-केवायसी न करणाऱ्यांची शिधापत्रिकेवरील नावे वगळली जाणार आहेत.

 Last Chance for Ration Card e-KYC!

सर्व ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना
राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने यासंबंधी राज्य सरकारला त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व रास्त भाव दुकानांवर ई-केवायसी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रलंबितता
भोर तालुक्यात एकूण 1,18,335 लाभार्थ्यांपैकी 41,248 ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे या ग्राहकांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा त्यांचे रेशन कार्ड अवैध ठरू शकते.

सरकारने दिले कठोर निर्देश
राज्य सरकारने सर्व तालुका पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना आठवड्याच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या लॉगिनमध्ये प्रलंबित नोंदी उपलब्ध असून, त्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

लाभार्थ्यांसाठी आवाहन
रेशन कार्ड धारकांनी तुरंत ई-केवायसी करून शिधापत्रिका वैध ठेवा, अन्यथा मोफत धान्य योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. मुदत समाप्त होण्यापूर्वीच आपली प्रक्रिया पूर्ण करा!

Leave A Reply

Your email address will not be published.