सुवर्णसंधी !! १०वी, ITI उत्तीर्णांसाठी रेल्वेत अप्रेंटिस भरती ; ९३३ रिक्त पदे ! ७७०० रुपये स्टायपेंड ! त्वरित अर्ज करा

Railway Apprentice Golden Chance!

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागांतर्गत नागपूर डिविजन व मोतीबाग वर्कशॉपमध्ये अप्रेंटिस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. १०वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण येथे केवळ प्रशिक्षण दिलं जाणार नाही, तर प्रशिक्षण कालावधीत मासिक स्टायपेंडही दिला जाणार आहे.

Railway Apprentice Golden Chance!

या भरतीसाठी रेल्वेने आरआरसी एसईसीआर (RRC SECR) नागपूरमार्फत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना secr.indianrailways.gov.in किंवा www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम मुदत ४ मे २०२५ आहे.

अप्रेंटिसशिप अंतर्गत उमेदवारांना रेल्वेच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल. नागपूर डिविजनमध्ये ८५८ पदे व मोतीबाग वर्कशॉपमध्ये ७५ पदे अशा एकूण ९३३ जागांसाठी ही भरती आहे. पदांमध्ये फिटर, कारपेंटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, प्लंबर, पेंटर, वायरमन आदींचा समावेश आहे.

पात्रता बाबत सांगायचं झालं तर, उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळामधून किमान ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अधिक तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना वाचावी.

वयोमर्यादा ही किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे इतकी आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व इतर आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया केवळ मेरिटवर आधारित आहे. उमेदवारांची निवड १०वी व ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

या अप्रेंटिस ट्रेनिंगदरम्यान उमेदवारांना दरमहा १ वर्षासाठी ७७०० रुपये व २ वर्षांचा ITI कोर्स केलेल्यांना ८०५० रुपये इतका स्टायपेंड मिळणार आहे. सर्व अर्ज मोफत असून, कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ही संधी पूर्वी अप्रेंटिसशिप केलेल्या उमेदवारांसाठी नाही. ज्या उमेदवारांनी पूर्वी अन्यत्र अप्रेंटिसशिप केली आहे, त्यांचे अर्ज अमान्य ठरवले जातील. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

ही भरती केवळ एक नोकरी नाही, तर भविष्य घडवण्याची संधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करावा!

Leave A Reply

Your email address will not be published.