अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीनं प्रक्रिया सुरू कोटाअंतर्गत जास्त प्रवेश !

Quota Round Sees High Admissions!

राज्यात सध्या अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीनं प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतल्या ‘शून्य फेरी’ म्हणजे कोटांतर्गत (इनहाउस, व्यवस्थापन, अल्पसंख्याक) प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांची यादी गुरुवारी कॉलेजांनी प्रसिद्ध केली.

Quota Round Sees High Admissions!पहिल्याच दिवशी तब्बल ९,०८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश पक्का केला. यामध्ये मुख्यतः ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थीच होते. नामवंत कॉलेजांमध्ये सामान्य फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता असल्यामुळे बऱ्याच हुशार विद्यार्थ्यांनी थेट कोट्यातून प्रवेश घेणं पसंत केलं.

‘इनहाउस कोटा’चा भारी जलवा!
सर्वच कॉलेजांसाठी यंदा एकाच ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे चांगल्या कॉलेजांसाठी स्पर्धा मोठी आहे. त्यामुळं बहुतांश गुणवंत विद्यार्थ्यांनी इनहाउस कोट्याला जास्त पसंती दिली. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या यादीत इनहाउसमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी दिसून आले.

१४ जूनपर्यंत प्रवेश घ्या!
ही यादी गुरुवारी सकाळी कॉलेज स्तरावर लावण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांचे नाव यादीत आहे, त्यांनी १४ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे, असं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी सांगितलं.

यंदा पहिल्यांदाच राज्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एकाच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून राबवली जातेय. नवीन वेळापत्रकानुसार अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी प्रसिद्ध झाली आणि गुरुवारी कोट्यातील प्रवेश सुरू झाला.

एकूण अर्जांची आकडेवारी:

  • कोट्यातून एकूण अर्ज – १,१३,०४८

  • इनहाउस कोट्यातून अर्ज – ५२,४६८, प्रवेश – ३,८७१

  • व्यवस्थापन कोट्यातून अर्ज – ३६,९९१, प्रवेश – १,०२२

  • अल्पसंख्याक कोट्यातून अर्ज – २३,५८९, प्रवेश – ४,१९४

महत्त्वाची सूचना:
कोट्यातून प्रवेश घेणं ऐच्छिक आहे. पण एकदा कोट्याद्वारे प्रवेश घेतला, की त्या विद्यार्थ्यांना पुढच्या सामान्य फेऱ्यांतून वगळण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.