Good News !! पुणे शहरात चार रेल्वे टर्मिनल विकसित होणार ! | Pune Gets Four Railway Terminals!

Pune Gets Four Railway Terminals!

पुणे शहराच्या वेगवान विकासामुळे येथे रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील चार रेल्वे स्थानकांच्या विकासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये उरुळी येथे सर्वात मोठ्या टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली.

Pune Gets Four Railway Terminals!

पुणे हे शैक्षणिक हब असल्याने देशभरातून येथे प्रवाशांची मोठी मागणी असते. उत्तर प्रदेश, बिहार आणि जबलपूर या भागांतून पुण्यासाठी अधिक रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. या मागणीच्या अनुषंगाने पुण्यातील रेल्वे स्थानकांच्या विकासाची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या रिमॉडेलिंगसह हडपसर टर्मिनल आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा विकास सुरू आहे. त्याचबरोबर उरुळी येथे मोठे रेल्वे टर्मिनल उभारले जात आहे, जे भविष्यात पुण्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

देशातील मोठ्या शहरांमध्येही रेल्वे स्टेशनच्या सुधारणा करून रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा उपक्रम रेल्वे मंत्रालयाने हाती घेतला आहे. बेंगळुरूतील स्टेशन सुधारणा केल्यानंतर प्रवासी सुविधांमध्ये वाढ झाली आहे. त्याच धर्तीवर पुण्यासह इतर मोठ्या शहरांमध्ये रेल्वे प्रकल्प राबवले जात आहेत.

या उपक्रमामुळे पुणे आणि परिसरातील रेल्वे सेवा अधिक सुकर होईल तसेच प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.