खुशखबर !! मराठवाड्यात ७३ प्राध्यापकांची भरती ! जाणून घ्या सविस्तर माहिती
Professor Recruitment Process Accelerated !
राज्य शासनाने प्राध्यापक भरतीसाठी निश्चित कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ प्राध्यापक पदांच्या भरतीची प्रतिक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे.
१५ वर्षांनंतर ऑगस्ट २०२३ मध्ये भरतीची जाहिरात निघाली, मात्र अर्ज छाननी सुरू होण्याआधीच भरतीला स्थगिती मिळाली. दरम्यान, आरक्षणाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला. नवीन आरक्षण धोरणानुसार मंत्रालयाची लेखी मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि इच्छुक उमेदवारांना नवीन अर्ज करावे लागतील.
विद्यापीठात एकूण २८९ पैकी १४० हून अधिक जागा रिक्त होत्या. २०१७ पासून भरतीवरील निर्बंधांमुळे ही पदे भरता आली नव्हती. शासनाच्या नव्या निर्णयानुसार ८०% मंजूर पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ७३ पूर्णवेळ शिक्षक पदांसाठी मंजुरी मिळाली. या भरतीसाठी ऑगस्ट २०२३ मध्ये ५,८१५ अर्ज आले होते, मात्र त्यांना ग्राह्य धरले जाणार नाही.
नवी कार्यपद्धती आणि भरती प्रक्रिया
✔ शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन व अध्यापनाला ८०% गुण
✔ मुलाखतीस २०% गुण
✔ किमान ५०% गुण मिळवणारे उमेदवार अंतिम निवडीस पात्र
✔ मुलाखतीत संशोधन व अध्यापन कौशल्यांचे मूल्यमापन
✔ निवड प्रक्रियेचे चित्रीकरण सीलबंद स्वरूपात ठेवले जाणार
विद्यापीठाने भरती प्रक्रियेसाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असून, मंजुरी मिळाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होईल.