नवीन बातमी !! राज्यातील पोलीस भरतीला आता विलंब! | Temporary Extension for Police, Recruitment Delayed!
Temporary Extension for Police, Recruitment Delayed!
राज्यातील पोलिस भरतीला विलंब होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गृह विभागाने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या कार्यरत असलेल्या तीन हजार पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. याचा अर्थ, पोलिस भरती प्रक्रिया काही महिन्यांपर्यंत लांबणीवर पडणार आहे.
राज्यभरात पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यात तत्पर असतात, पण सध्याच्या परिस्थितीत पोलिसांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील १३ कोटी लोकसंख्येची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांची २४ तास जबाबदारी आहे. तथापि, मुंबई पोलिसांत अनेक पदे रिक्त आहेत आणि कायमस्वरूपी पदांची भरती मंद गतीने सुरू आहे.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात, सध्या तीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत गृह विभागाने शासन आदेश जारी केला आहे. राज्यातील पोलिसांची संख्या २ लाख १९ हजार ८२२ मंजार आहे, पण त्यापैकी १ लाख ९८ हजार ८०७ पदे भरण्यात आली आहेत, त्यामुळे २१ हजार १०८ पदे रिक्त आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ४० हजार ६२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई संवर्गाची सुमारे १० हजार पदे रिक्त आहेत. यामुळे मुंबई पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळ अपर्याप्त आहे. २०२१ च्या शासन निर्णयानुसार बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयासाठी ७ हजार ७६ पोलिस शिपाई संवर्गातील पदे भरण्यास मंजुरी दिली होती, मात्र सध्याच्या भरती प्रक्रियेमध्येही ३ हजार पदे रिक्त राहिलेली आहेत.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाद्वारे भरलेली ३ हजार पदे आणि त्यासाठी दिलेल्या ११ महिन्यांच्या मुदतवाढीने, भरती प्रक्रिया अधिक लांबणीवर पडली आहे. राज्य सरकारने हंगामी सेवा मुदतवाढ दिल्यामुळे, आगामी काही महिन्यांमध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया अधिक मंद गतीनेच सुरू राहील.
राज्यभरात पोलीस विभागाच्या रिक्त पदांच्या भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणे आवश्यक आहे, अन्यथा सुरक्षा संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.